बडूर मध्ये 9 जानेवारी रोजी फिरते लोक अदालत संपन्न
बिलोली तालुक्यातील बडूर मध्ये जिल्हा विधी प्राधिकरण सेवा नांदेड तसेच तालुका विधि सेवा समिती बिलोली व अभिवक्ता समिती संघ बिलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने
फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन दि.०९/०१/२०२६ रोजी
मा.वि.ब.बोहरा साहेब,[ जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी समिती बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली बडूर ग्रामपंचायत मध्ये अनेक जणांचे कायदेविषयक फायली ठेवण्यात आले त्यामध्ये वादी प्रतिवादी यांना बोलविण्यात आले
होते परंतु फिरती लोक अदालतच्या दोन जणांचे वाद मिटवून फाहिली निकाली काढण्यात यश आले आहे
. यावेळी एडवोकेट मरखले साहेब तसेच प्रभुराज दिगंबर गुजरवाड आणि ग्रामपंचायत च्या सरपंच सौ चेतना मोहन जाधव उपसरपंच जगन्नाथ व्यंकटी गुजरवाड मा. हनमंतराव पोलीस पाटील मा.सरपंच वसंतरावजी पाटील बालाजी पोटमलवाड पांडुरंग तारे मा.सरपंच मनोहरजी गुजरवाड अनिल गौड बसा गौड मारुती गुजरवाड गोविंद गोंणशेटवाड तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधीः नंदकुमार स्वामी बडूरकर✍️
