*जिजाऊ जयंती म्हणजे मातृत्वाचा दिवस*
जयप्रकाश गोणशेटवाड
श्री शिव शंकर माध्यमिक विद्यालय वनाळी ता.देगलूर येथे नुकतीच राष्ट्रमाता,राजमाता माँ साहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री सुरेश वनंजे सर यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.श्रुती इंगळे व मोनाली इंगळे या विद्यार्थिनीनी माँ साहेबांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर मरियम शेख,जोया शेख,श्रुती कोकणे,मोनाली इंगळे,श्रद्धा इंगळे,रागिनी इंगळे,इकरा पठाण,संध्या भंडारे,ऋतुजा बोयेवार,गौशिया पठाण आदी विद्यार्थिनी दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.या विद्यार्थिनींनी माँसाहेब जिजाऊंची हुबीहुब पोशाख परिधान करून वातावरण माँ साहेब जिजाऊमय करून टाकले.त्यानंतर जोया शेख व मरियम शेख यांनी ‘आम्ही शिवकन्या’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करत सर्वांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक वनंजे सर म्हणाले की, आजचा दिवस हा माँ साहेब जिजाऊ यांचा आदर्श घेण्याचा दिवस.माँ साहेबांच्या ठिकाणी मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व होतं त्यामुळेच शिवबा सारखे कर्तुत्वान व्यक्तिमत्व जन्माला आले म्हणून आजचा दिवस हा मातृत्वाचा दिवस आहे.आपणही माँ साहेब जिजाऊंचा व राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन एक आदर्श कृतुत्वान व्यक्ती म्हणून घडायचे आहे.अशी त्यांनी मनोगतातून भावना व्यक्त केले.यावेळी वनाळी केंद्राचे विशेष शिक्षक एन.के.वाघमारे सर, ब्रह्मानंद अब्दागिरे,राम संगनाळे सर,राजेंद्र राजुरे,यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बामणे सर,श्री कदम सर,दिमलवार सर,श्री खिसे सर,श्री मोरे सर,सौ.अंजली देशमुख,श्री दिलीप पाटील सर, मारुती अंकमवार मामा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी पेटेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बारडवार सर यांनी मानले.
