फुलसावंगी-किनवट रस्त्यावर भीषण अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन विद्यार्थी जखमी
फुलसावंगी ते किनवट रोडवरील शिवाजीराव मोघे कॉलेजसमोर 13 जानेवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालवाहू ऑप्पे रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांसह रिक्षाचालक हि जखमी झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एम.एच. २९ बी.डी. ३७५८ क्रमांकाची मालवाहू ऑप्पे रिक्षा फुलसावंगीच्या दिशेने येत होती. व किनवटच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच. २९ सी.एन. ६८७२ क्रमांकाच्या दुचाकीला रिक्षाने जोरदार दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालक पंडित चव्हाण वय ३२ वर्ष, रा. कुरळी, ता. उमरखेड यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शाळकरी विद्यार्थी सागर पंडित हाके रा. टाकळी ता. उमरखेड आणि राहुल दत्ता राठोड रा. नारळी ता . उमरखेड हे दोघेही जखमी झाले आहेत. यासोबतच रिक्षाचालक आकाश गंगाधर बोईनवाड वय ३७, रा. कुरळी या. उमरखेड हा देखील किरकोळ जखमी झाला आहे.
फुलसावंगी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, राहुल राठोड याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी पुसद येथे हलवण्यात आले
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महागाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Ct india News यवतमाळ विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागांव
फुलसावंगी-किनवट रस्त्यावर भीषण अपघात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन विद्यार्थी जखमी
