*अंत्री खेडेकर येथे गयबन शाह बाबा यांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा.*
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे सर्वधर्म समभाव असलेली दर्गा हाजी हजरत गयबन शाह वली यांचा उरूस १४ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. याच दिवशी मकर संक्रांती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस आणि पीर बाबांची पुण्यतिथी सोहळा असतो या तिन्ही शुभ दिवसांचे औचित्य साधून सर्वधर्मीयांनी मिळून समता, बंधुता आणि एकता आत्मसात करून या सोहळ्याची शोभा वाढवली.
*किती आनंदी, किती चैतन्यदायी श्रद्धेचा हा दिवस,*
*उजेडात न्हाऊन निघाला पीर गयबन शाहचा उरस…*
बाबांची पालखी दर्गाचे खादिम अय्युब शेख रतन यांच्या घरातून निघून थेट दर्गा शरीफवर फुल चादर, मजार ए गिलाफ आणि चंदनाचा लेप म्हणजेच संदल सायंकाळी ७ वाजता बाबांना अर्पण करण्यात आला. यावेळी दर्गाचे खादीम अय्युब शेख, हमीद शेख, शकुर खान, राम सदाशिव माळेकर, रामेश्वर बद्रीनाथ खेडेकर, गोपाल पवार, आकाश सुदामदेवा खेडेकर, आदित्य माळेकर, करण पेंढारकर राजू भाई शेख, दिपेश मोरे, संविधान मोरे, अकिल शेख, नाणेतज्ञ शेख दिलावर आदीं भाविक भक्त उपस्थित होते.
*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*
