सिल्लोड / प्रतिनिधी
शेतातील सामायिक विहिरीवरून शेतीसह पिण्यासाठी पाणी भरण्याच्या वादातून लहान भावासह भावजयी आणि विज्ञान केल्यानंतर अपमान सहन न झालेल्या मोठ्या भावाने थेट गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सिल्लोडच्या यशवंत नगर भागात घडली. संजय तान्हाजी दुधे (51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यासंदर्भात संजय दुबे यांची पत्नी रेखा यांच्या फिर्यादीनुसार राजू तानाजी दुधे (49), त्याची पत्नी लता दुधे (43), संदीप राजू दुधे (19) आणि दुसरा अल्पवयीन मुलगा या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा दुधे यांच्या फिर्यादीनुसार राजू त्याची पत्नी लता व त्यांच्या दोन मुलांनी संजय दुधे यांना तुझ्या नावावरील अर्धा एकर जमीन आमच्या नावावर करून दे असे धमकावत दोन वेळा मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा 14 जानेवारीला संजय दुधे सकाळी साडेनऊ वाजता स्वतःच्या शेतात गेल्यानंतर विहिरीतील मोटर बाहेर काढत होते. त्यावेळी पुन्हा राजू व त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा तेथे येऊन संजयशी वाद घालत त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. अपमान आणि मारहाण सहन न झालेल्या संजय यांनी जखमी अवस्थेतच घरी आल्यानंतर काही क्षणातच गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, फिर्याद दाखल झाल्यानंतर काही वेळातच सिल्लोड पोलिसांनी राजू व दीपक दुधे या पितापुत्रांना अटक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी.आर. कायंदे अधिक तपास करीत आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संजय दुधे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
