छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती होऊ नये ऐनवेळी कर्तव्य बजावण्याकडे पाठ फिरवणाऱ्या 155 सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून या सर्वांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक कर्तव्याला ठेंगा दाखवणाऱ्यांमध्ये बहुतांश प्राध्यापक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने शासकीय विभाग आणि शैक्षणिक संस्थांच्या शेकडो प्रतिनिधींची नियुक्ती महापालिका निवडणुकीसाठी केली होती. या संदर्भात पत्रव्यवहार करून या कर्मचाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांना कळविलेही होते. निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पत्राद्वारे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला होता. असे असूनही तब्बल 155 अधिकारी कर्मचारी 14 व 15 जानेवारीला निवडणूक कामाकडे फिरकलेच नव्हते. यानंतर अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय मानवतकर यांनी या सर्व 155 अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
*गुन्हा दाखल झालेले अधिकारी, कर्मचारी*
पांडुरंग विठ्ठलराव देशतवाड, (पंचायत समिती फुलंब्री), अनिल श्रीराम परदेशी (पंचायत समिती फुलंब्री), कांचन हरीभऊ कायंदे, कृष्णा रामराव शिंदे (पंचायत समिती फुलंब्री), भरत दादाराव कुडले (नगर पंचायत, फुलंब्री), भगवान फकीरचंद होनमाळी, (नगर पंचायत फुलंब्री), गजानन त्रिंबक तावडे (नगर पंचायत फुलंब्री), मधेकर कृष्णा मुरलीधर (पंचायत समिती फुलंब्री), सय्यदा आसरा जैदी इजाज अली, मौलाना आझाद काँलेज (छत्रपती संभाजीनगर), खान अब्दुल सत्तार करीम खान (फुलंब्री), संतोष रामदास जाधव (पंचायत समिती फुलंब्री), राजेंद्र वामनराव जगताप (पंचायत समिती फुलंब्री), संजय पंडीतराव जोगदंड (पंचायत समिती फुलंब्री), दिलीप शेनफडू निकम, (पंचायत समिती गंगापूर), संतोष चिंतामन अंबीलढगे (छत्रपती संभाजीनगर), रमेश पंडीत ताठे, (छत्रपती संभाजीनगर), अनिल माधवराव दसरे (छत्रपती संभाजीनगर), अविनाश आत्माराम शिंगणे (छत्रपती संभाजीनगर), मुजोबोद्दीन तुराबोद्दीन शेख (छत्रपती संभाजीनगर), पाटील सि.के. (छत्रपती संभाजीनगर), देशमुख एस.ए. (छत्रपती संभाजीनगर), भारत जनार्धन बोराडे (छत्रपती संभाजीनगर), जितेंद्र लक्ष्मणराव कुलकर्णी (छत्रपती संभाजीनगर), योगेश भास्कर थोटे (छत्रपती संभाजीनगर), प्रविण व्यंकटराव देशमुख (छत्रपती संभाजीनगर), विनोद भिमराव रबडे (छत्रपती संभाजीनगर), मजीबोद्दीन नसीरोद्दीन (छत्रपती संभाजीनगर), प्रदीप यशवंत पाटील (छत्रपती संभाजीनगर), पी.बी.देवकाते (छत्रपती संभाजीनगर), हेमलता गुलाबराव ठाकरे (छत्रपती संभाजीनगर), डॉ. बीना कुमारी स्नेगर (छत्रपती संभाजीनगर), कुंडलीक विठ्ठलराव राठोड (छत्रपती संभाजीनगर), शेख जाकेर इसाक (छत्रपती संभाजीनगर), रंजीतसिंहंग कृष्णराव निंबाळकर (छत्रपती संभाजीनगर), राजेश पृथ्वीराज राठोड (छत्रपती संभाजीनगर), भगत बालाजी हनुमंत (छत्रपती संभाजीनगर), दोंवंगावे प्रदीप गोवींदराव (छत्रपती संभाजीनगर), रामेश्वर प्रभाकर विधाते (छत्रपती संभाजीनगर), सुनील निवृत्ती शेरखाने (छत्रपती संभाजीनगर), दिपक संतोषराव साळुंके (छत्रपती संभाजीनगर), कार्तीक अंकुश चव्हाण (छत्रपती संभाजीनगर), श्रीपात प्रकाशराव मुळे (छत्रपती संभाजीनगर), किशोर विठ्ठलराव सिरसाठ (छत्रपती संभाजीनगर), मनोज गजानन शेटे (छत्रपती संभाजीनगर), डॉ.महादेव मुरारी गायकवाड, जयदत्त बाबूलाल शुक्ला, नागेश विनायकराव अंकुश, मुक्तार रतन पटेल, अनिल तुळशीराम गुले, रविंद्र रामदास शिंदे, संजय लक्ष्मण सावंत, सलाउद्दीन कुतूबुद्दीन शेख, तन्मय अरविंद पाथरीकर, प्रतिका भगवान बोराडे, सुनीता नरेंद्र चौधरी, दिनेश लक्ष्मणराव लिंगमपल्ले, सचिन जयवंतराव गाडेकर, डॉ.मकरंद अरविंद पैठणकर, अमोल रमाकांत साबळे, डॉ. मस्ताजबी अहमद मसोद्दीन खान, अविनाश सुरेश मुर्ते, निलेश प्रकाश साळवे, दत्तात्रय चंद्रकांत पर्वत, एन.एल. तजवी, दिलीप भानुदास फुंडे, परमेश्वर साळवे, व्यंकट शिकापुरे, राजेश शहाणे, पंकज शंकर राठोड, दिपा नविनचंद चौधरी, सचिन रंगनाथ चव्हाण, आर.एल.चव्हाण, मोहम्मद जहीर मोहम्मद बशीर, विजय मधुकर येवले, सुंदर पंडातराव मुंडे, श्रीकांत मारोती गायकवाड, डॉ. शत्रुंजय मृत्यूंजय कोटे, मुग्धा सुरेश पाटील, सुनील कोंडगी वाघ, डॉ.अर्चना संदीपान गिरी, सय्यद जलील उर रहेमान, राजेश्री प्रसाद अष्टेकर, अर्चना कडुबा पालकर, नारायण गणेशराव चोरमाळे, अनिरुध्द नागनाथराव वसमतकर, मनिषा रुस्तुमराम काळे, सुरेखा दत्तात्रय हरवाळे, अंबादास प्रभाकर कदम, निलेश बाळासाहेब बडे, शिवाजी रामचंद्र जाधव, मनिषा वसंतराव शिरसाट, विकास रामचंद्र शिंदे, गिता मनोहर साखरे, खाजा मोईनोद्दीन नुर मोहम्मद शेख, दिलीप रामभाऊ वाघ, सुरेश मोतीलाल परदेशी, अजित नथुजी दांडगे, निलीमा रंजीत राजपुत, सुधीर मनोहर आवटे, कृष्णा गवनाजी बोरसे, सुरज देविदास जोशी, किशोर लक्ष्मणदास वैष्णव, लक्ष्मण प्रल्हादराव लाखोले, अमर गणेशसिंग गौर, मनिष दत्तात्रय मोरे, राम गबरु चव्हाण, पोपट रामकृष्ण सपकाळ, श्रीकृष्ण बापूराव झाजन, बबन पांडुरंग पाटील, प्रविण प्रेमदास बोबडे, मोतीराम चव्हाण, शेषराव संपतराव गर्जे, खान अशऱफ खान युनूस खान, किरण विठ्ठल गांगुर्डे, भरत शिवराम पाटील, बाळासाहेब व्यंकटराव कोपळे, आदिनाथ तोताराम सुरासे, शैलेंद्र भिमसेन विटोरे, शेख मोबीन शेख शोएब, पठाण अब्दुल रहीम, बुढाण गुलाब सय्यद, अंकुश श्रीरंग हिवाळे, चेतन नागनाथराव गावडे, संभाजी भाऊसाहेब बनकर, रमेश सुभाष पाटील, भागीनाथ दादा सोनवणे, किशोर नामदेव माळवे, प्रमोद देवीदाल घोरपडे, माधुरी मुंजीराम दलाल, कल्पना सुधाकर बच्चाव, कल्पना रामभाऊ जाधव, मंदाकिनी विनायक काळे, प्रतिभा तातेराव थोरात, वैभव खेडकर, तुषार पोहनीकर, शोभा अहिरे, मनोज अंधारे, बाळासाहेब बडे, कविता असोले, सचिन रमेश साळवे, गणराज देवराव उचित, वसंत पाटील, जितेंद्र लक्ष्मण जाधव, किरण लिंगराम शुरकांबळे, लहू बाबूराव घुटे, डॉ. रमेश प्रभाकरराव चोंडेकर, बाबासाहेब सावळीराम जाधव, वसंत श्यामराव बर्वे, नितीन रामेशवर तागडे, दिपक मारोतीराव सोनवणे, अब्दुल हसीब अब्दुल वहीद, वैभव नामदेव सोनवणे, अजय गणपत देशमुख, शरीफ मोतीलाल शेख, डॉ.नंदा चंदनराव देशमुख, छत्रपती संभाजीनगर
