मुद्रा आरोग्य पत्रिका चे आयोजन मोहाडी येथे…..!!
मौदा:-दिनांक 16/1/2026 ला राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत श्री महेंद्रजी चकोले यांच्या शेतावर मौजा- मोहाडी ता. मौदा येथे रब्बी हंगाम शेतकरी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच बांधावर जैविक निविष्ठा तयार करणे जीवामृत, दशपर्णी अर्क यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले, तसेच अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र व निमस्त्र व बीज प्रक्रिया करण्यासाठी लागणारे बीजामृत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक शेती करनेकारिता लागणाऱ्या पुस्तिका तसेच मृदा आरोग्य पत्रिका यांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांधावर निविष्ठा तयार कराव्या त्याचा जास्तीत जास्त वापर करावा त्याच्या नोंदी दिलेल्या डायऱ्या वर घ्याव्या इत्यादी महत्त्वाच्या गोष्टीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना महाविस्तार ए आय अप डाऊनलोड करून देण्यात आले. त्याचे महत्त्व वापर करण्याच्या पद्धती व कृषी विभागामार्फत चालणाऱ्या इतर योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. सदर कार्यक्रमास श्री दिनेश फुंडे बीटीएम मौदा, श्री प्रशांत शेंडे एटीएम मौदा श्रीमती ऋतुजा माने सहायक कृषी अधिकारी मोहाडी,श्रीमती माधुरी गुणराज लेंडे, कृषी सखी मोहाडी, श्रीमती वृषाली आकाश डोंगरे कृषी सखी मोहाडी श्री गुणराज लेंडे अध्यक्ष बळीराजा नैसर्गिक शेतकरी गट मोहाडी व गटातील शेतकरी उपस्थित होते.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
