स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल गोंदिया ची धडाकेबाज कारवाई ……!!
स्थानिक लोकांची बँक खाते प्राप्त करून ऑनलाईन फसवणूक करणारे छत्तीसगड दंतेवाडा येथील २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया चा जाळ्यात……!!
–००–
गोंदिया:-दिनांक १५/०१/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक साो, गोंदिया यांचे निर्देशाप्रमाणे व पो.नि. पुरुषोत्तम अहेरकर स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे आदेशान्वये पो.स्टे. रामनगर हद्दीत अवैध धंदे कारवाई व चोरी, घरफोडी आरोपी शोध कामी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस पथकास माहिती मिळाली की, हॉटेल आर्चिड, कुडवा नाका, तिरोडा रोड, गोंदिया येथील एका रुम मध्ये काही इसम पैशाचे आमिष दाखवून लोकांकडून अकाउंट (बँक खाते) प्राप्त करून आनलाईन पध्दतीने पैशाचे गैरव्यवहार करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक हॉटेल आर्चिड येथे जावून विचारपुस करण्यात आली असता, हॉटेलमध्ये छत्तीसगड चे दोन इसम मागील २ दिवसापासून थांबले असल्याचे समजले. हॉटेल येथील थांबलेल्या रूम मध्ये जाऊन दोन्ही इसमांना चेक करण्यात आले असता त्यांचे नावं १) शेख आसिफ शेख अहमद, २७ वर्षे, रा. हाउस नं. १५/८२, राजेंद्र नगर, वार्ड, क्र. १५, दंतेवाडा, राज्य छ.ग २) सचिनकुमार संतोष पटेल, वय २२ वर्षे, रा. गांधी वार्ड, वार्ड क्र. ९, दंतेवाडा, राज्य छ.ग असे सांगितले. दोन्ही इसमांना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले की, पैशाचे आमिष देवून स्थानिक लोकांकडून बँक खाते उघडून त्या बँक खाते ची बँक धारकाचे मो.न. सिम सह संपूर्ण किट प्राप्त करतो. त्यानंतर सदर बँक खात्याचा वापर करून आनलाईन गेमींग मध्ये प्राप्त होणारी रक्कमेचा व्यवहार सदर बँक खाते मार्फत करतात व स्थानिक लोकांची फसवणूक करतात असे सांगितले. दोन्ही इसमाचे अंगझडती घेण्यात आली असता त्यांचे कडे स्थानिक इसमाचे नावाने उघडण्यात आलेले बँक ऑफ इंडियाचे करंट खाते , त्याचे चेकबुक, सिम कार्ड , ३ अँड्रॉइड मोबाइलला अशा एकूण ३२,०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र. ४५ /२०२६ कलम ३१९(२), ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२), ३(५) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, यांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात मपोउपनि वनिता सायकर, पोहवा प्रकाश गायधाने, महेश मेहर, दीक्षितकुमार दमाहे , संजय चव्हाण, इंद्रजित बिसेन, पो.शि. संतोष केदार, दुर्गेश पाटील, स्थागुशा. तसेच पोहवा प्रमोद सोनवाने, रोशन येरणे , चापोशी खंदारे यांनी केली आहे.
गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
