करगाव आश्रम शाळेत इंग्रजी विषयाच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यशस्वीरीत्या संपन्न*..

उपसंपादक चाळीसगाव ता. विकी पानकर. मो. 8605074861

 

📰 *करगाव आश्रम शाळेत इंग्रजी विषयाच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा यशस्वीरीत्या संपन्न*..

शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली इंग्रजी विषयाच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आबासाहेब पी.जे.पाटील हे होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक दादासाहेब पी.आर. राठोड तसेच पर्यवेक्षक दादासाहेब ए.बी.राठोड होते.या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सहभाग घेतला. होता.या स्पर्धेची संकल्पना पर्यवेक्षक श्री. ए. बी. राठोड सर यांची होती.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. बी. एम. मालपुरे सर व श्री. पि. के. मोरे सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या अंतर्गत —

पर्यवेक्षक श्री. ए. बी. राठोड सर यांच्याकडून प्रत्येकी ₹100

इंग्रजी विषयाचे विषय शिक्षक श्री. पि. के. मोरे सर यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्यास एक रजिस्टर नोटबुक

इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. बी. एम. मालपुरे सर यांच्याकडून प्रति विद्यार्थ्यास उत्कृष्ट प्रतीचे एक्झाम पॅड,कलाशिक्षक श्री. डी. यु. चव्हाण सर यांच्याकडून प्रत्येकी ₹100 प्रयोगशाळा सहाय्यक श्री. बालेंद्र राठोड सर यांच्याकडून प्रत्येकी ₹100.दिलेत .अशी भरघोस बक्षिसे विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेत*.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाबद्दल गोडी निर्माण झाली असून, सर्व देणगीदार, परीक्षक व सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमास दोन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,सर्व विद्यार्थी व काही पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *