माजी सभापती नरेंद्र बंधाटे च्या सौजन्याने हमलापूरी येथे मंडई उत्सव

माजी सभापती नरेंद्र बंधाटे च्या सौजन्याने हमलापूरी येथे मंडई उत्सव .

 

रामटेक तालुका अंतर्गत नगरधन जवळील हमलापूरी या गावात माजी सभापती नरेंद्र बंधाटे यांच्या सौजन्याने चार दिवसीय भव्य मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .

 

15 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . ग्रामस्वच्छता अभियान , कुस्ती प्रतियोगीता , 9 अंकी नाटक प्रस्तुती , .कोल्हापूरी लावणी , तिळसंक्रात निमित्याने हळद कुंकु , दुय्यम तमाशा, दांडपट्टा अखाडा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले . तत्पुर्वी माजी नगरसेवक अनिल वाघमारे यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आला .

 

पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज चौधरी, अनिल वाघमारे, विमल त्रिपाठी , अजय मेहरकुळे शेखर पाटील, सुरेंद्र बिरणवार, रितेश बिरणवार , हर्षपाल मेश्राम या सर्व पत्रकारांचा माजी सभापती नरेंद्र बंधाटे यांनी शाल व श्रीफल देवून सत्कार केला . तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला .

 

 कार्यक्रमाचे संचालन सतिश बंधाटे यांनी केले .

 

सिटी इंडिया न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *