महागाव नगरीत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न.

महागाव नगरीत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा पादुका दर्शन सोहळा संपन्न.

 

विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागाव

 

 

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन दर्शन सोहळा रविवार दिनांक : 18 जानेवारी 2026 रोजी महागाव शहरातील क्रीडा संकुल, नवीन पोलीस वसाहतीच्या मागे, आठवडी बाजार समोर, महागाव शहर ,जिल्हा यवतमाळ पश्चिम येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उमरखेड महागाव चे आमदार मा. श्री किशनराव वानखेडे साहेब,माजी आमदार राजूभाऊ नगरधने साहेब,महागाव च्या नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई दिलीप कोपरकर, उमरखेड च्या नगराध्यक्षा सौ.तेजश्री संतोषराव जैन,मा.श्री तातू भाऊ देशमुख साहेब,श्री शैलेश कोपरकर साहेब,उमरखेडचे सदस्य अविनाश अग्रवाल साहेब,महागाव पोलीस उपनिरीक्षक श्री निळे साहेब,उमरखेड नगरसेवक श्री गजेंद्र ठाकरे साहेब, राजू कवाने साहेब, राजू शिंदे साहेब, सामाजिक कार्यकर्ते अंबादास धुळे साहेब, पश्चिम विदर्भ पिठाचे पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे साहेब,पीठ सहप्रमुख संजय खंडागळे साहेब,जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे,पीठ समितीचे अमर ईधोळ, माधव घोडे, वामनराव मोटे, प्रवीण कदम, महागाव तालुका अध्यक्ष रामदास ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई दिलीप कोपरकर यांच्या निवासस्थानी होत्या. त्यांनी खूप सुंदर व्यवस्था केली होती.या वेळी महागाव शहरातून जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांची सजवलेल्या रथा मधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभा यात्रेमध्ये अनेक देखावे सादर करण्यात आले. त्यामध्ये निशानधारी महिला,निशानधारी पुरुष, कलशधारी महिला, डफली पथक,बँड पथक,भजनी मंडळ,राम पंचायतन आदी पथकांचा समावेश होता. पादुकांचे संतपिठावर आगमन झाल्यानंतर जगद्गुरुश्रींची सामुदायिक आरती संपन्न झाली. रथांमधील यजमान बोरकर संत पिठाजवळील यजमान सतीश उरकुडे हे सपत्नीक होते.सामाजिक उपक्रमांतर्गत निराधार महिला लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 13 शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. ज.न.म. प्रवचनकार सौ.आशाताई राऊत यांचे सुमधुर असे प्रवचन संपन्न झाले. ताईंनी प्रवचन सेवेच्या माध्यमातून उपस्थित सर्व भक्तगणांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर गुरु पूजन, उपासक दीक्षा,जगद्गुरुश्रींचे अमृततुल्य ऑनलाईन प्रवचन,सिद्ध पादुका दर्शन सोहळा,रक्तदान शिबिर,पुष्पवृष्टी, सांगता आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. याच कार्यक्रमात 231 भक्तगणांनी उपासक दीक्षा घेतली. कार्यक्रमास 5000 ते 6000 हजार भाविकांची उपस्थिती होती.दिवसभर येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारत भाऊ वानखेडे व अभिलाष कदम यांनी केले तर सर्वांचे आभार जिल्हाध्यक्ष गजानन गरवारे यांनी मानले.

हा नयनरम्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा समिती,तालुका समिती,सेवा केंद्र समिती , आरती केंद्र समितीचे पदाधिकारी,युवासेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, प्रवचनकार, गुरु सेवक ,प्रोटोकॉल अधिकारी, आजी व माजी पदाधिकारी जिल्ह्यांतील भक्तगण गुरुबंधू व गुरु भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *