उमरखेड/ प्रेस क्लब ची मागणी चुरमुरा परिसरात रॉयल्टी च्या क्षमतेपेक्षा गौण खनिजाचे उत्खनन शिंदे कंट्रक्शनची चौकशी करून दंडात्मक कारवाई करा

उमरखेड/ प्रेस क्लब ची मागणी चुरमुरा परिसरात रॉयल्टी च्या क्षमतेपेक्षा गौण खनिजाचे उत्खनन शिंदे कंट्रक्शनची चौकशी करून दंडात्मक कारवाई करा

 

 

(उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांना तक्रार अर्ज दाखल)

✍🏻 जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव

 

उमरखेड – तालुक्यातील चुरमुरा येथे क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या शिवराज बाळासाहेब शिंदे यांच्यावर चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी- उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघ यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिंदे कंट्रक्शन चे संचालक शिवराज बाळासाहेब शिंदे यास दिनांक 12 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये 100 ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी तहसील कार्यालयाकडून देण्यात आली होती परंतु दिलेल्या कालावधीच्या आतच शिवराज बाळासाहेब शिंदे यांनी ठराविक 100 ब्रास गौण खनिज उत्खनन क्षमतेपेक्षा अधिक पट्टीने गौण खनिजाचे उत्खनन चुरमुरा येथे केल्याचे दिसून येत आहे आणि तिथे अजूनही अवैधरित्या खनिज उत्खनन सुरू असून प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून पर्यावरणात धोका निर्माण होईल असे कृत्य शिवराज बाळासाहेब शिंदे हे करीत आहे. जनतेच्या नजरेत महसूल अधिकारी व शिंदे कंट्रक्शन चे संचालक शिवराज शिंदे यांची मिली भगत असल्याची दिसून येत आहे उमरखेड परिसरात महसूल अधिकाऱ्याकडून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावण्याचे काम दिसून येत आहे वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी. करिता लेखी तक्रार सादर.केली आहे

सदर ही कारवाई 2 दिवसाच्या आत करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असे लेखी तक्रार उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाने पदाधिकाऱ्यांना दिले निवेदन .

 

यावेळी शामभाऊ धुळे अध्यक्ष (उमरखेड प्रेस क्लब), उपाध्यक्ष गजानन वानखेडे, सचिव सिध्दार्थ दिवेकर, बबलू भालेराव, प्रसेनजीत दिवेकर इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *