प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला महागांव युनियन बँक कडून २लाख रुपयाचा विमा
पेढी गावातील विमल रामदास ठाकरे (वय अंदाजे ४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया, महागाव शाखेत विमा काढलेला होता.
महागाव शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक व तत्परतेने कार्यवाही करत सर्व तांत्रिक बाबींचा पाठपुरावा जमा करून. परिणामी मृतकाच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २ लाख रुपयांचा विमा ठाकरे परिवारातील तात्काळ उपलब्ध करून देण्यात आला.
या प्रसंगी युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक किरण सावळे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक प्रमोद दुधाडे, ग्रामविकास अधिकारी सतीश कुबडे, दिलीप सिरतावार, वरिष्ठ लिपिक विनोद दुधे, संदीप वांगेकर, हनुमान इंगळे, गणेश पुरी, ऋषिकेश वांगेकर, ग्राहक सेवा संचालक गोपाल कासार व दिलीप जाधव उपस्थित होते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबाबत बँकेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बचत गटातील महिला व शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने या विमा योजनेचा लाभ घेतला आहे.
दरवर्षी केवळ ४३६ रुपयांत दोन लाखांचा जीवन विमा तसेच फक्त २० रुपयांत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाखांचा अपघाती विमा उपलब्ध असल्याने प्रत्येक नागरिकांनी या शासकीय विमा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा व्यवस्थापक किरण सावळे हे त्यांनी बोलताना सांगितले
Ct india News विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागाव
