शेतकरी कारखानदार झाला पाहिजे स्व.वसंतरावजी नाईक यांनी बघीतलेले स्वप्न

शेतकरी कारखानदार झाला पाहिजे 

स्व.वसंतरावजी नाईक यांनी बघीतलेले स्वप्न 

 

 प्रतिनिधी राम चव्हाण महागांव

 

हरितक्रांती चे प्रणेते माहाराष्टाचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक साहेब यांचे स्वप्न होते शेतकरी कारखानदार झाला पाहिजे आणि याच कल्पनेतून सत्तर च्या दशकात पुसद तालुक्यातील पोफाळी येथे विदर्भातील पहील्या सहकारी साखर कारखाण्याची मुहुर्तामेढ रोवण्यात आली तदनतंर कापुस एकाधीकार सहकारी जिनिगं प्रेसीगं,सुतगीरणी आशा आनेक सहकारातील शेतमालावर प्रक्रीया करुन कच्च्या मालाच्या रूपांतर पक्क्या मालात करणारे आनेक ऊधोग सहकाराच्या माध्यमातून ऊभारली गेली त्यातील त्यांच्या हक्काच्या कर्मभुमी आणि जन्मभुमीतील पहीला शेतकर्याच्या मालकीचा हा प्रकल्प त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जलक्रांती चे प्रणेते स्व सुधाकर नाईक साहेब यांचे कल्पनेतुन साकारलेला सहकारातील पुष्पावंती साखर ऊधोग दुर्देवाने आज दोन्ही प्रकल्प खाजगीकरणात रूपांतरीत होऊन ‌,(नाव बदलुन) यशस्वीपणे सुरु आहेत 

नैचरल शुगर युनिट दोन तर आनेक विक्रम मोडुन यशस्वीते कडे वाटचाल करीत आहे त्यामुळे खर्या अर्थाने स्व वसंतराव नाईक साहेब यांचे स्वप्न एक प्रकारे साकार होत असल्याचे चीत्र आजमीतीस या परीसरात दिसुन येत आहे पंरतु आज शेतकरी मुळ भागधारक मालक नाही हा भाग वेगळा पंरतु हा ऊधोग व्यवस्थीत आणि पारदर्शकता ठेवुन चालविल्यास काय विकास साधता येतो हे आता दिसुन येत आहे त्यामुळे स्व नाईक साहेबांचा दुरदर्शीपणा किती मौल्यवान होता हे आपल्या विचारा पलीकडे आहे पुष्पांवती सुरु होण्यापूर्वी सवना शिवारात नवचंडीका देवी परीसरात माळपठारावर हजारो एक्कर सुपीक व सपाट काळीकसदार सुपीक जमीन आहे पंरतु कोरडवाहू आहे या जमीनीचे मालक गरीब रोजमजुरी करणारे बहुतांश लोक आहेत या ठिकाणाला लागुन खालुन काही मीटर अंतरावर अधर पुस प्रकल्पाचे पाणि वाहते पंरतु हे गरीब शेतकरी लिफ्ट ऐरिकेशन करू शकत नाहीत ही बाब १९८० मध्ये वंसत कारखान्याचे चेअरमन स्व बाळासाहेब देशमुख सवनेकर यांचे लक्षात आली आणि लीफ्टद्वारे माळपठारावर पाणि पोहचविण्यासाठी काम सुरू झाले नंतर काय अडचण आली माहीत नाही काम अर्धवट राहीले या घटणेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे यांनतर पुष्पांवती ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली तो सुध्दा सहकारातुन खाजगीकरणात गेला सुरवातीला वारणा ग्रुप नंतर काही काळ बंद अवस्थेत राहुन नैचरल ग्रुपणे ताब्यात घेतला तेव्हापासुन आज सतत दहाव्या गळीत हंगामापर्यतं यशस्वी रित्या चालवीत आहेत त्यामुळे यापरीसतील आर्थिक आलेख वाढतांना दिसत आहे पण या माळपठारावर यशस्वी ऊस लागवड झाली आहे आजरोजी पहीला मानकरी आमचे मीत्र अरवीदं करोडकर ठरले आहेत यापुढे या भागात शेकडो एक्कर भविष्यात ऊस लागवड होईल असे वाटते असे झाल्यास कारखाण्याच बाहेरील तालुक्यातील ऊस लागवडीसाठी करावा लागणारा वाहतूक खर्च कमी होऊन कारखान्यात ताजा ऊस उपलब्ध होईल आणि एकाच तालुक्यातील ऊस क्षेत्रातवर कारखाणा पुर्ण क्षमतेने चालल्याने ऊत्पादंकाना चारपैसे जादा दर मीळण्यास सोईचे होईल हे निश्चित या करीता स्थानीक प्रशासन शेतकरी व कारखाना व्यवस्थापनाने सामुहीक प्रयत्न करण्याची गरज आहे तरच हे शक्य होईल आणि आजतरी एका अर्थाने स्व वसंतराव नाईक साहेब यांचे स्वप्न साकार होत आसल्याचे चीत्र या परीसरात दिसुन येत आहे हे नक्की 

  

    गोविंदराव देशमुख सवनेकर 

ऊस उत्पादक शेतकरी सवना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *