कृषी अधिकाऱ्यांनी केली उत्तम राठोड यांच्या फळबागाची पाहणी

कृषी अधिकाऱ्यांनी केली उत्तम राठोड यांच्या फळबागाची पाहणी

 

 

 प्रतिनिधी राम चव्हाण महागांव 

 

महागाव तालुक्यात आगष्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकासह फळबागाचे प्रचंड असे नुकसान झाले होते.याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तात्काळ नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतीचे व फळबागाचे पंचनामे करण्याचेआदेश तलाठी व कृषी सहाय्यकांना देण्यात आल्या होत्या.मात्र वाकान येथील शेतकरी ऊतम पांडुरंग राठोड यांच्या फळबाग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले होते.परिनामी संबंधित शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या फळबागाचे अनुदान न मिळाल्याने तहसील कार्यालयात लेखी तक्रारीतुन निवेदन सादर केले होते.व वृत्तपत्राच्या माध्यमातून संबंधित कृषी विभागातील व महसूल तलाठ्यानी केलेली घोड चुक लक्षात आणुन दिल्याने अखेर बुधवारी दिनांक २१ जानेवारी रोजी संबंधित महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी उतम पांडुरंग राठोड यांच्या शेतीच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन फळबाग क्षेत्राची पाहणी केली यावेळी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आढळून आल्याने सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवुन तहसीलदार साहेब यांच्या निदर्शनास आणून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन देन्याचे आश्वासन दिले यावेळी कृषी अधिकारी फाळके साहेब,कृषी सहायक माने, कृषी अधिकारी एन आर पाईकराव, सरपंच आश्वजित भगत, उपसरपंच परेश राठोड, महसूल सेवक शरद वंजारे, शेतकरी उतम पांडुरंग राठोड , तसेच दैनिक अधिकारनामा वृत्तपत्र चे प्रतिनिधी रवि राठोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *