वैजापूर / प्रतिनिधी
व्यवसायाच्या वाढीसाठी व्याजाने घेतलेल्या पैशांसाठी खासगी सावकारांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैजापुरातील शेख करीम शेख (45) या बटाटा व्यापाऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी शेतकरी मेनी व्हिडिओ तयार करून त्यात सावकारांची नावे घेत त्यांच्या ठरावाला कंटाळूनच जीव देत असल्याचे रेकॉर्ड करून ठेवले आहे.
यानंतर पोलिसांनी करीम यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख यांनी आत्महत्या पूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये पैशांच्या कारणावरून सात जण त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. आपल्या आत्महत्येस हे सात जणच जबाबदार असल्याचेही त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे. यानंतर शेतकरी यांच्या नातेवाईकांनी संबंधित सात जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार वैजापूर पोलिसांनी अनु आजम शेख ( रा. गोल्डन नगर, वैजापूर), वसीम बाबू बागवान (रा. गंगापूर), विलास शेटे (रा. श्रीरामपूर), घायवट बाई (रा. फुलेवाडी रोड, वैजापूर), विनोद पद्मसिंग राजपूत (रा. परदेशी गल्ली, वैजापूर), मुकेश पद्मसिंग राजपूत व विक्रम शिवसिंग राजपूत ( दोघेही रा. महाराणा प्रताप रोड वैजापूर) या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
