सिटी चौकातून तरुणी चार दिवसांपासून गायब

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी

सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील एक 21 वर्षीय विवाहित तरुणी 20 जानेवारीपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात या महिलेचा पती शफिक शाह सलिम शाह (रा. जुना बाजार, पोस्ट ऑफीससमोर, नूर कॉलनी , छत्रपती संभाजीनगर यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. फातेमा बेगम शफिक शाह (21) असे या विवाहित तरुणीचे नाव असून, रंग गोरा, बांधा मध्यम, उंची 5 फुट 2 इंच, नाक सरळ, डोळे काळे, चेहरा गोल, केस काळे, हिंदी भाषा बोलते, अंगात ग्रे रंगाची सलवार त्यावर पांढ़ऱ्या रंगाचा फुले असलेला टॉप व काळ्या रंगाचा बुरखा, पायात काळ्या व पांढऱ्या रंगाची सॅंडल, सोबत आधार कार्ड, टीसी, फोटो, पॅन कार्ड, मतदान कार्ड असलेली गुलाबी रंगाची स्कूल बॅग, शिक्षण ५ वी, सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल असे तिचे वर्णन आहे. या महिलेबाबत माहिती आढळल्यास सिटी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार सुधाकर मिसाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *