*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोलंबी येथे २९ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रम

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोलंबी येथे २९ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रम*

 

*ह. भ. प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनातून ग्रामविकासाचा जागर*

नायगाव | फोटो : 

राज्यातील ग्रामीण भाग अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोलंबी ग्रामपंचायत च्या सयोजनातून श्री शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. शिवलीलाताई पाटील यांच्या प्रभावी कीर्तनातून ग्रामविकास, लोकसहभाग आणि मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश दिला जाणार आहे.

 

     हा कार्यक्रम रविवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडणार असून, श्री शंकरराव चव्हाण विद्यालय पटांगणात होणाऱ्या,कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत कोलंबी, ता. नायगाव, जि. नांदेड यांनी स्वीकारले आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी खुला असणार आहे.

  देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे मा. ना. श्री. नरेंद्र मोदी (प्रधानमंत्री) व मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामपंचायतींना आर्थिक, प्रशासकीय व सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे होय. याच अनुषंगाने लोकशिक्षण, जनजागृती व संस्कार यांचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तनाचा वापर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास मा. ना. श्री. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), मा. ना. श्री. अजित पवार (उपमुख्यमंत्री), मा. ना. श्री. जयकुमार गोरे (मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज) तसेच मा. ना. श्री. योगेश कदम (राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज) यांचे मार्गदर्शन लाभत असून, शासनाच्या विविध ग्रामविकास योजना, स्वच्छता अभियान, पारदर्शक कारभार, लोकसहभाग आणि समृद्ध गाव ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ह. भ. प. शिवलीलाताई पाटील यांच्या ओजस्वी व प्रेरणादायी कीर्तनातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना व विकासात्मक दृष्टिकोन निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला-भगिनी, युवक व सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ओमकार पोतलवाड नायगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *