जि.परिषद प्राथमिक मराठी शाळा जनुना येथे प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा
प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागाव
महागांव तालुक्यात ४१६ लोकसंख्येचे गावा. जनूना येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक ७७वा दिन अत्यंत उत्साहात व वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.१९५० मध्ये याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला
१९५० मध्ये याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला जनूना गांव शाळेची पटसंख्या सात विद्यार्थ्यांची असून शिक्षक शहाजुल शेख यांनी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आहार पुष्पगुच्छ टाकून
ध्वजारोहण शाळा सुधारक समितीचे अध्यक्ष श्री मुकिंदा चांदू खिलारे यांच्या हस्ते करण्यात आले . व भाषणे व छोट्या खाणी माध्यमातून “एक भारत, श्रेष्ठ भारत” हा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतातील भाषा, संस्कृती, परंपरा व ऐक्य यांचे जिवंत चित्र उभे राहिले. पालक व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेकडून प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून भारताची विविधता म्हणजेच भारताची ताकद हा संदेश प्रभावीपणे दिला.
सात विद्यार्थ्यांची शाळा कट बुद्धि स्वतःसारखी निर्माण करून साथ ही विद्यार्थ्यांथी व विद्यार्थिनी छोट्याशा गावात आपली कलारचना दाखऊन आपल्या माता-पिताचे शिक्षकाचे व गावातील नागरिकांचे मन जिंकले 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन पूर्ण भारतात साजरा होतो व भारत देश एकतेसाठी ओळखला जातो” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी भारताची विविधता आणि एकता यांचे सुंदर दर्शन घडवले. या कार्यक्रमाला
शाळा सुधारक समिती अध्यक्ष श्री मुकिंदा चंदू खिल्लारे. (उपाध्यक्ष) राजू तुळशीराम इंगोले. गावच्या (उपसरपंच)सौ. कोमल विजय थोरात. ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोंडबा इंगोले.तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव रामा दवणे. उपाध्यक्ष. दिलीप मारुती इंगोले. अंगणवाडी (सेविका) सीमा अरविंद आढागळे. (मदतनीस) शिल्पा मिथुन आढागळे.(आशा वर्कर ) जयमला चंद्रकांत दवणे. संगीता विनोद नरवाडे. छत्रपती जयवंतराव इंगोले. गावचे सामाजिक कार्यकर्ते उत्तम रामा दवणे. बौद्ध आचार्य श्री.राहुल गुणाजी नरवाडे व व समस्त गावकरी नागरिकांच्या उपस्थित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन प्राथमिक मराठी शाळा जनुना येथे केला साजरा
