यवतमाळ/शेतकरी आत्महत्या चा जील्हा म्हणुन झालेली नोदं संपुष्टात येईल ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जील्हा ओळखल्या जाईल
प्रतिनिधी राम चव्हाण महागांव
सवना/ नव चंडिका देवी मंदिर माळ पठावर अनिल ठोबंरे यांनी केली पाहणी
सवना शिवारात नवचंडीका देवी मंदिर परिसरात वरील बाजूस नैचरल शुगर युनिट दोन पासुन आवघ्या दोन तीन किमी परिसरात माळरानावर हजार एकर कोरडवाहू सुपीक जमीन आहे व खालच्या पायथ्याला अधरपुस प्रकल्पाचे पाणी रात्रंदिवस वाहत आहे पंरतु मागील चाळीस वर्षात या माळपठारावरील गरीब शेतकरी सिचंना पासुन वंचीत आहे शासन शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कोरडवाहू जमीन पाण्याखाली आनन्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे मागेल त्याला विहीर,शेततळे अशा विविध सिंचनावर आधारित योजना राबविण्यात येतात परंतु कमी खर्चात जास्तीत जास्त जमीन पाण्याखाली आनन्यासाठी कुठे काय काम करायला पाहिजे हे सुध्दा शासनाच्या निदर्शनास आणून त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास आनेक शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी वेळ लागणार नाही तीन दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रांचे प्रतीनीधीनी माळपठारावरील पहीला ऊस उत्पादक अरवीदं करोडकर यांची यशोगाथा आपल्या वृत्तपत्रातुन प्रसीध्द केली होती आणि त्याचा परिणाम आज नैचरल शुगर युनिट दोन कारखाना साईटवर ध्वजारोहण कार्यक्रम निमीत्ताने मा.कृषीरन्त बि बी ठोबंरे यांचे बंधु आले आसता त्या ठिकाणी अरवीदं करोडकर यांचा त्यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मी सुध्दा वृत्तपत्रात ही बातमी पाहून ही जमीन बघण्याची माझी ईच्छा आहे तेव्हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच ते आपल्या आधीकार्यासह या माळरानावर दाखल झाले आपन सर्वानी मीळुन लीफ्ट एरिकेशन करावे रस्ता वैगरे ज्या काही आडचणी आसतील त्या सामुहीक पणे सोडवाव्यात आम्ही सुध्दा मार्गदर्शन करु आसे यावेळी त्यांनी सांगितले भविष्यात या ठिकाणी नदंनवन होण्यासाठी वेळ लागणार नाही या करीता स्थानिक पातळीवर सर्वघटकांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करण्याची गरज आहे आज रोजी सवना या एका शिवारात कारखान्यात एक लाख टन ऊस पुरवठा होत आहे भविष्यात तो दोन लाख टनावर जाईल यामुळे सवना गावात वर्षाकाठी काही कोटी रूपयांची उलाढाल होईल त्यामुळे परीसराचा आर्थिक विकास होईल आणि एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही यवतमाळ जिल्ह्याची शेतकरी आत्महत्या चा जील्हा म्हणुन झालेली नोदं संपुष्टात येईल ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जील्हा म्हणुन ओळखल्या जाईल अशी प्रतिक्रिया गोविंदराव देशमुख सवनेकर यांनी मांडली आहे
