महाराष्ट्र शासनाच्या ( आत्मा ) या योजने अंतर्गत क्रुषी विभाग अलिबाग व क्रुषी विभाग महाड

महाराष्ट्र शासनाच्या ( आत्मा ) या योजने अंतर्गत क्रुषी विभाग अलिबाग व क्रुषी विभाग महाड यांच्या सहकार्याने क्रुषी महोत्सव २०२६ बारामती येथे शिवलंका शेतकरी उत्पादक कं.ली.महाडच्या सभासद शेतकऱ्यांसाठी शिवलंका शेतकरी उत्पादक कं.ली.चे अध्यक्ष क्रिष्णा सोनावले व उपाध्यक्षा अर्चना धाडवे यांनी शेतकरी प्रशिक्षण सहलीचे आयोजन केले होते.या शेतकरी प्रशिक्षण सहलीमध्ये महाड तालुक्यातील विविध गावातील ४० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.बारामती मध्ये सुरु असलेल्या क्रुषी महोत्सवा मध्ये महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीचे मार्गदशन देण्यात आले.पशुपालन असेल किंवा फुल बाग असेल किंवा मधमाशी पालन असेल अशा वेगवेगळया शेतीची माहीती शेतकऱ्यांना देण्यात आली.शेतीसाठी लागणारी वेगवेळया पदधतीची अवजारे शेतकऱ्यांना पाहायला मिळाली.या शेतकरी प्रशिक्षण सहली साठी महाड तालुका क्रुषी अधिकारी धिरज तोरणे साहेब व तालुका क्रुषी सहायक तंत्रज्ञान व्यावस्थापक नितीन मोरे साहेब यांचे अनमोल सहकार्य लाभले.या शेतकरी प्रशिक्षण सहलीचा शिवलंका शेतकरी उत्पादक कं.ली.महाडच्या सभासद शेतकऱ्यांनी मन मनसोक्त आनंद घेतला .हि शेतकरी प्रशिक्षण सहल जानेवारी २३ व २४ ०१/२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *