*प्रशासकीय सुधारणांमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांचा डंका; पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव

*प्रशासकीय सुधारणांमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांचा डंका; पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव* 

 

 

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-प्रशासन सुधारणा मूल्यमापन कार्यक्रमात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने संपूर्ण राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने करण्यात आलेल्या या तपासणीत नागपूर ग्रामीणने २०० पैकी १६१ गुण मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. २६ जानेवारी २०२६ रोजी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीच्या १०० दिवसांच्या उपक्रमातही या कार्यालयाने दुसरे स्थान मिळविले होते.

या मोहिमेअंतर्गत संकेतस्थळ, ई-कार्यालय, माहिती फलक आणि भ्रमणध्वनीवरील स्वयंचलित संवाद प्रणाली अशा विविध निकषांवर नागपूर ग्रामीणने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ‘आपले सरकार’ संकेतस्थळाद्वारे चारित्र्य आणि पारपत्र पडताळणी सेवा दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात मोठे यश मिळाले आहे. तसेच गुन्हे तपासात गती आणण्यासाठी ‘महा गुन्हे प्रणाली’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता मदतनीस’ यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येत असून त्याद्वारे १२७ अधिकाऱ्यांनी २६० हून अधिक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. तांत्रिक प्रगती आणि पारदर्शक प्रशासनामुळे नागपूर ग्रामीण पोलीस दलाने सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरावर आपले नाव कोरले आहे.

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *