अखेर वाकान कोनदरी येथे मानव विकास बस सेवा सुरु: विद्यार्थ्यांमधुन समाधान व्यक्त

अखेर वाकान कोनदरी येथे मानव विकास बस सेवा सुरु: विद्यार्थ्यांमधुन समाधान व्यक्त!

 

प्रतिनिधी राम चव्हाण महागांव

 

महागाव तालुक्यातील वाकान कोनदरी येथील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने आपला जिव मुठित घेऊन प्रवास करावा लागत होता गेल्या अनेक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने पुसद आगार प्रमुखाकडुन काळी मार्गे पोखरी, कोनदरी, वाकान गावच्या बस सेवा तात्पुरती बंद करावी लागली होती.मात्र ह्या बस सेवा बंद असल्याने वाकान कोनदरी येथील कोसलगे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत होता व खाजगी वाहनाने धोकादायक प्रवास करावा लागत होता या समस्येची तात्काळ दखल घेत दैनिक अधिकारनामा वृत्तपत्र प्रतिनिधी रवि राठोड यांनी आपल्या वृत्तपत्रात अनेकवेळा बातम्या प्रकाशित करुन हि समस्या पुसद आगार येथे प्रमुख अधिकाऱ्यांना शाळेच्या मुलीच्या समीक्षा लक्षात आणुन दिल्या.त्याच बरोबर कोसलगे महाविद्यालयातील मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी आगार प्रमुखाकाकडे वारंवार पत्रव्यवहार करून हि बस सेवा तात्काळ सुरू करन्याची मागणी केली होती कोदंरी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल राठोड यांनीही वारंवार पाठपुरावा करुन सहकार्य केल्याने अखेर पुसद आगार प्रमुखाकाकडुन मुलीला शाळेत अपडाउन करण्यासाठी मानव विकास बस सेवा सुरु केल्याने समस्त कोसलगे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधुन समाधान व्यक्त करन्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *