महागांव/तुळजापूर नागपूर महामार्गावर एकाच दिवशी तीन-तीन अपघात

महागांव/तुळजापूर नागपूर महामार्गावर एकाच दिवशी तीन-तीन अपघात

 

 

 

तुळजापूर-नागपूर मार्गावरील मुडाणा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर हा तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा एक हात गमवावा लागल्याची गंभीर माहिती आली आहे. ही घटना दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. असून एकाच दिवशी तीन तीन अपघात घडल्याची घटना समोर आली आहे या अपघातानंतर जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुळजापूर नागपूर महामार्गावर दुचाकी मोटर सायकल सवार वाहतूक नियंत्रणाचे पालन करून स्वतःची सुरक्षेसाठी हेल्मेट चा वापर करणे गरजेचे आहे या मार्गावर भरधाव वाहने व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून, अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *