महागाव येथे भाजप शहर पक्षयची संवाद बैठक संपन्न. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

महागाव येथे भाजप शहर पक्षयची संवाद बैठक संपन्न. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती 

 

 

 

प्रतिनिधी राम चव्हाण महागांव

 

 

    भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी महागाव शहर मंडळाच्या वतीने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व सक्रिय कार्यकर्ता संवाद बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संवाद बैठकीला माजी तालुकाप्रमुख दीपक आडे, माजी तालुकाप्रमुख विलास शेंबे, शहर मंडळ अध्यक्ष निलेश नरवाडे, माजी नगर उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश पाटील नरवाडे, माजी तालुका सरचिटणीस संजयजी पाटे, भारतीय जनता पार्टी गटनेते गजानन साबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामजी खंदारे , जगदीश नरवाडे पाटील,आणि के. डी. नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शहर मंडळ सरचिटणीस रघुनाथ नरवाडे, विशाळ डाहळे, भारतीय जनता पार्टी महिला तालुका अध्यक्ष माया भाई राजनकर , नगरसेविका रंजना ताई आडे नरवाडे बाई, छाया खंदारे बाई, पुष्पा कावळे बाई, निर्मलाबाई सोयाम आणि मुकिंदा आबोरे ,श्रीकांत राऊत , गजानन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला असून शक्ती केंद्र आणि बूथ स्तरावर पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सक्रिय राहण्याचे आवाहन केले. या संवाद बैठकीमुळे महागाव शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असून, संघटन वाढीसाठी सर्वांनी कंबर कसली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *