महागांव नगर पंचायत अध्यक्षांच्या गैरव्यवहाराची विशेष चौकशी

महागांव नगर पंचायत अध्यक्षांच्या गैरव्यवहाराची विशेष चौकशी

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चार सदस्यीय समिती गठीत

 

 

महागांव नगर पंचायत, जि. यवतमाळ येथील अध्यक्षांकडून दि. २५ ऑगस्ट २०२३ पासून झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले असून, यासाठी चार सदस्यीय विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथून दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित आदेशानुसार नगर पंचायत महागांव येथील प्रशासकीय व आर्थिक कारभाराबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभाग, मंत्रालय तसेच मुख्याधिकारी, नगर पंचायत महागांव यांच्या पत्रांच्या आधारे चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

या विशेष चौकशी समितीच्या अध्यक्षपदी अजितकुमार येळे, (उपविभागीय अधिकारी (ल.सी.का.), यवतमाळ), अजय कुरवाडे, (मुख्याधिकारी, नगरपरिषद उमरखेड) – सदस्य, पूनम धिंगाणे, (सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा) – सदस्य आणि मोहन गाडगे, (विधी अधिकारी) – सदस्य यांचा समावेश आहे.

 

सदर समितीने महागांव नगर पंचायत अध्यक्षांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व मुद्यांची, निर्णयांची व व्यवहारांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सविस्तर अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

दरम्यान, या चौकशीच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत महागांवमधील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, यावर संबंधितांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रतिनिधी दीपमाला धुर्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *