पोलीस स्टेशन रामतीर्थ हद्दीत दिनांक 25/01/2026 रोजी सकाळी 05:22 वा नरसी ते बिलोली जाणाऱ्या रोडवर मध्यवर्ती बँकेच्या समोर रोडच्या दुभाजकावर बसलेली गाय आणि वासरू सदर वासराला गाय गाडीमध्ये टाकून तस्करी केली सदर गाईचे वसरा करिता अत्यंत हळहळ दिसून आहे. त्यावरून पोलीस स्टेशन रामतीर्थ तेथे गुन्हा रजिस्टर नंबर 10/2026 कलम 303 (2) 3(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात गो तस्करी/ चोरी करणारे आरोपी 1) मोहम्मद अजीम मोहम्मद सिराज राहणार नांदेड.2) शेख आश्रम पिताशकेल राहणार मनोर तालुका जिल्हा पालघर मनोर तालुका जिल्हा पालघर 3) आयुब खान राहणार मुंब्रा जिल्हा ठाणे मा. पोलीस अधीक्षक आंबीनाश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामतीर्थ व स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केलेली आहे सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन XUV कार ही सुद्धा जप्त केलेली आहे सदर आरोपी सध्या रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे
