*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक लोणार तालुका सचिव शेख लतिफ तर सुलतानपूर शहराध्यक्ष शेर खान*
लोणार तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. युवा सामाजिक कार्यकर्ते शेख लतिफ शेख रहीम यांची लोणार तालुका सचिवपदी, तर शेर खान सरदार खान पठाण यांची सुलतानपूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही सर्व नियुक्त्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या असून, अधिकृत नियुक्तीपत्रे अल्पसंख्याक लोणार तालुका अध्यक्ष शेख सुलतान शेख मुख्तार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
नियुक्तीनंतर शेख लतिफ म्हणाले, “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझ्या कार्याची खरी पावती आहे. लोणार तालुक्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याचा माझा संकल्प आहे.”
तर शेर खान यांनी सांगितले, “पक्षाने दिलेली जबाबदारी अहोरात्र पार पाडण्याचा संकल्प करतो. समाजासाठी, लोकहितासाठी निष्ठेने काम करणार आहे.”
पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या विचारांवर विश्वास ठेवून तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवत, सर्व समाजघटकातील नागरिक मोठ्या संख्येने पक्षात सहभागी होत असल्याचे मत व्यक्त केले.
या नियुक्तीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष अॅड. नाझेर काज़ी, प्रदेश सरचिटणीस इरफान अली आणि जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद यांनी लोणार तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शेख सुलतान यांना दिले.
नियुक्ती पत्र वितरण कार्यक्रमात तालुका अध्यक्ष अंबादास खंड, मा. सभापती भगवानराव सानप, आणि लोणार शहर अध्यक्ष तौफीफ भाई उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी नवीन नेत्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*
