महागाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांच्या विरोधात जिल्हाअधिकाऱ्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल
महागाव नगरपंचायत नगर अध्यक्ष यांच्या विरोधात जिल्हा अधिकाऱ्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरपंचायतीत विकासकामांपेक्षा राजकीय हालचालींना वेग आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त , ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीतील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याचे समजते. या चौकशीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायत नोंदींमध्ये खोडतोड किंवा काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याच्या चर्चाही सुरू असून याबाबत अधिकृत स्तरावर तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बहुमताच्या समीकरणांभोवती सुरू असलेल्या घडामोडींमुळे प्रशासनिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
2026 च्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडींना विशेष महत्त्व दिशा ठरणार की काय
विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण यवतमाळ यांची रिपोर्ट
