ह.भ.प. तानाजी बापू महाराज यांचे मधुर वाणीत मुडाणा आश्रम येथे श्री मद भागवत कथा सप्ताह

ह.भ.प. तानाजी बापू महाराज यांचे मधुर वाणीत मुडाणा आश्रम येथे श्री मद भागवत कथा सप्ताह

 

प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

 

४५ वर्षांची परंपरा : ११ फेब्रुवारी पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

महागाव तालुक्यातील मुडाणा येथे विश्वशांती अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह व भागवत कथा ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. गेल्या ४५ वर्षांपासून या पारायणाची परंपरा मुडाणावासीयांनी जपली आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मुडाणा येथे आरोग्य विषयक तसेच समाजप्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

निजाम आश्रम संस्थेतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी काकडा, अभिषेक पूजा, ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भागवत कथा, हरिपाठ व भारुड तसेच रात्री कीर्तन होणार आहे.भागवताचार्य. गुरुवर्य ह.भ.प तानाजी महाराज बोरकर, कीर्तनकार युवा कीर्तनकार ह भ प प्रणव महाराज हातलेकर , बुधवार हभप अभय महाराज टाले, गुरवारी हभप विनोदाचार्य दिगंबर महाराज नखाते हातगावकर ता पाथरी जि. परभणी, शुक्रवारी

हभप विजय महाराज गवळी, रा.मालेगावकर शनिवारी

हभप भागवताचार्य दिगंबर महाराज कुंचलवार शिंगावाडीकर, रविवारला हभप सोपान महाराज सानप, हिंगोली सोमवारी

हभप अशोक महाराज तळणीकर, मंगळवारी

ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक हभप देवानंद महाराज वानखेडे, हभप नंदकुमार खंदारे, हभप अनिल महाराज

पुरी, हभप साहेबराव महाराज शिंदे, हभप आहे. चोपदार साहेबराव कोंडबा वैद्य, मारुती जाधव चोपदार सांगडे महाराज महागावकर आहेत.

आरोग्य तपासणी,१५ फेब्रुवारी १०ते१ सामूहिक विवाह

■ ४५ वर्षांपासून दिवंगत एकनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह घेतला जात आहे. एकनाथ महाराज यांनी ६ जुलै १९९१ रोजी देह त्यागला. त्यानंतर संचालक मंडळ परंपरा पुढे नेत आहे. यादरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.१५ फेब्रुवारी सकाळी १० ते १ पर्यंत हभप

गुरुवर्य भागवत धर्मप्रचारक

तानाजी बापू बोरकर रा.मुडाणा यांचे काल्याचे कीर्तन होईल. तत्पूर्वी पालखी मिरवणूक आणि सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद व सांगता

होणार आहे. या सप्ताहासाठी निजधाम आश्रम संस्था अध्यक्ष परसराम भगजी वानखेडे, सदानंद पाटील, सर्व संचालक, शिक्षक, गावकरी परिश्रम घेत आहेत.

 

तब्बल ४५ वर्षांपासून मुडाणा येथे हे आयोजन केले जात आहे. दरवर्षी या कार्यक्रमाबाबत पंचक्रोशित भाविकांना उत्सुकता असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *