महागांव/नगराध्यक्ष सुनंदा सुरोशे पायउतार तर अविश्वास ठराव १२ विरुद्ध 0 मतांनी पारित

महागांव/नगराध्यक्ष सुनंदा सुरोशे पायउतार तर अविश्वास ठराव १२ विरुद्ध 0 मतांनी पारित

 

 

 

 

 

 

 

 

 

महागाव नगर पंचायतीत ४ वर्षाच्या सत्ताकाळात दुसऱ्यांदा राजकिय उलटफेर काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष सुनंदा दिलीप सुरोशे यांच्या विरोधात नगर सेवकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध शुन्य मतांनी पारित झाला त्यामुळे नगराध्यक्षांना पायउतार व्हावे लागले. गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर यांनी आपल्या आईचे नगराध्यक्षपद वाचविण्यासाठी पराकोटीचा आटापिटा केला परंतू त्यांना अखेर तोंडघशी पडावे लागले. 

 

 

नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी नगर पंचायत सभागृहाच्या परिसरात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटांचे समर्थक उपस्थित,त्यामुळे तणावाची स्थितीची लाट अखेर कोपरकर गटाने समोर पराभव अटळ असल्याचे दिसताच सभागृहातून काढता पाय घेतला. काँग्रेस गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर यांच्या मनमानी कारभारामुळे विरोधक बिथरले परंतू सत्तेत काँग्रेस सोबत असलेल्या नगरसेवकांचा विश्वासही कोपरकर यांनी गमावला.

 

भाजपाचे गटनेते गजानन साबळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश नरवाडे, सौ.रंजना दीपक आडे,सौ.अशा शंकर बावणे,

शिवसेनेचे नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे,

रामराव नरवाडे,

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल प्रकाश पांडे,

 

सौ.सुनीता शिवाजी डाखोरे, सौ. करुणाताई नारायण शिरबिरे. या सोबतच सत्ताधारी काँग्रेस चे परवेज शफी सुरैया,श्रीमती जयश्री अशोक इंगोले, सौ.जयश्री संजय नरवाडे या सर्वपक्षीय बारा नगरसेवकांनी नगराध्यक्षांची उचलबांगडी करण्यासाठी कंबर कसली. शेवटी नगराध्यक्षा सुनंदा कोपरकर यांच्या विरोधतील अविश्वास ठराव तर बारा विरुद्ध शुन्य मतांनी पारित झाल्याची घोषणा पिठासीन सिद्ध.अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी केली. नगराध्यक्ष सुनंदा सुरोशे कोपरकर, गटनेते शैलेश सुरोशे कोपरकर, नगरसेविका सुरेखा विनोद कोपरकर, रुपाली संतोष कोल्हेकर आणि नगरसेवक महेश पाटील हे मतदानाला सभागृहात यांची उपस्थित नव्हती

 

Ct india News जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *