*पवित्र रमजान महिन्यात लोडशेडिंग बंद करण्याची मागणी; महावितरणाला निवेदन….*
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सुलतानपूर येथे सुरू असलेले भारनियमन (लोडशेडिंग) तात्काळ बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी महावितरणकडे केली आहे. याबाबत मा. उपअभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) शाखा सुलतानपूर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. १८ फेब्रुवारी २०२६ पासून रमजान महिना सुरू झाला असून या काळात मुस्लिम बांधव रोजा पाळतात. पहाटेच्या वेळेस सहरीसाठी उठणे, नमाज अदा करणे तसेच दिवसभर उपवास करणे अशा धार्मिक कृती पार पाडल्या जातात. तसेच सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सुरू असल्याने त्यांना अभ्यासासाठी रात्री व पहाटे वीजेची आवश्यकता असते. रमजान मध्ये रात्री ३.00 ते ४.00 वाजताच्या दरम्यान सहेरी (रोजा धरण्या साठी ) उठाव लागते जर वीजपुरवठा खंडित होत असला तर नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यात सुलतानपूर येथील लोडशेडिंग तात्काळ बंद करून सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करावा, अशी विनंती सुलतानपूर येथील उप सरपंच नागवंशी संघपाल पनाड.युवा नेते अनित्य घेवन्दे. मुस्लिम युवा नेते अख्तर भाई .जमीर साहब पत्रकार.आमिर भाई ग्रामपंचायत सदस्य पुत्र.सद्दाम भाई ग्रामपंचायत सदस्य पती.आसीम पठाण एआईएमआयएम सुलतानपूर शहर अध्यक्ष.रेहान भाई.मुकद्दर पठाण.लालू मुललाजी.वसीम भाई पत्रकार. इम्रान पहेलवान.सय्यद अजीम भाई. शेख राजिक भाई.सालार खान .यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत तहसीलदार, तहसील कार्यालय लोणार तसेच महावितरण शाखा लोणार यांनाही देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*
