अंजनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

अंजनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

 

सिटी इंडिया न्यूज बिलोली

जयप्रकाश गोणशीटवाड.

 

बिलोली तालुक्यातील मौजे अंजनी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अंजनी गावचे पोलिस पाटील राहुल हांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरूवात केले . गावातील ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला मंडळे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला मोठी शोभा आली.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिवगर्जना, घोषवाक्ये देण्यात आली पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवकांनी स्वराज्यकालीन शौर्यगाथा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

यावेळी अंजनी माजी सरपंच महेश हांडे, सेवा सहकारी सोसायटी अंजनी चेअरमन प्रतिनिधी गोविंद बदे्वाड, सेवा सहकारी सोसायटी अंजनी व्हाईस चेअरमन चंद्रशेखर पाटील,शिवराज पाटील, प्रहार संघटनेचे गणेश हांडे,इरेश मुंडकर, नागोराव पाटील,शंकर भुसेवाड, दत्ता बिराजदार, अशोक पाटील, प्रकाश पाटील ,वैजनाथ शिंगारे, अवधुत धुंदे, अंबादास बावलगावे, शंकर बिराजदार, बाळु मुंगडे, गोरख यंकुचे, संतोष यंकुचे, विष्णू मुंगडे , ब्राह्म मुंगडे, आनंदा मुंगडे , शेरफोद्दीन शेख, अमिर शेख, रिलस्टार खंडु बावलगावे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “जय शिवाजी, जय भवानी”च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीला इतिहासाची ओळख होते आणि समाजात एकात्मता वाढीस लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *