रामटेक येथील जयप्रकाश वॉर्डमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवगर्जना युवा प्रतिष्ठान, जयप्रकाश वॉर्ड, रामटेक यांच्या वतीने भव्य कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी उत्तम प्रकारे शिवकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच कै. विठ्ठलराव हटवार प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी प्रश्नावली स्पर्धा तसेच वेषभूषा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शिवगर्जना युवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. अनेक राजकीय ,सामाजिक मान्यवर लोकांनी महाराजांना अभिवादन केले.शिव कालीन दान पट्टा चे प्रदर्शन करण्यात आले. शिवगर्जना प्रतिष्ठान व सर्व सदस्य हे छत्रपती चे विचारा चे प्रचार प्रसार कार्यक्रम चे आयोजनातून करतात ct India news साठी प्रतिनिधी राहुल हटवार
