साखरखेर्ड्यात तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी राधेश्याम बंगाळेंचे उल्लेखनीय कार्य CT India News प्रतिनिधी जुबेर शाह साखरखेर्डा येथे सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून विशेषतः तरुण पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, काही ठिकाणी घटस्फोटासारख्या गंभीर घटना घडल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षांपासून राधेश्याम बंगाळे हे आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून तरुणांना तसेच नागरिकांना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहेत. लोकसेवा नशा मुक्त केंद्र या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत शेकडो लोकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला आहे. आयुर्वेदिक औषधोपचारांच्या सहाय्याने दारूचे व्यसन सोडवण्यासोबतच आम्लपित्त, इसबगोल, मुळव्याध, पोटाचे विकार, वजन कमी करणे, केस गळती, अर्धांगवायू, साखर (मधुमेह), वात, मुंग्या येणे, शिरा दुखणे अशा विविध आजारांवरही त्यांची औषधे प्रभावी ठरत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. दारू सुटल्याचे अनेक फोन कॉल्स दररोज येत असून, साखरखेर्डा परिसरातील वडीलधारी मंडळी तसेच तरुण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. व्यसनमुक्तीच्या या चळवळीमुळे अनेक कुटुंबांचे संसार वाचले असून समाजात सकारात्मक बदल घडत आहे. खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या भावनेतून राधेश्याम बंगाळे हे लोकसेवा नशा मुक्त केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी मोलाचे योगदान देत आहेत.

साखरखेर्ड्यात तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी राधेश्याम बंगाळेंचे उल्लेखनीय कार्य

CT India News

प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा येथे सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून विशेषतः तरुण पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, काही ठिकाणी घटस्फोटासारख्या गंभीर घटना घडल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षांपासून राधेश्याम बंगाळे हे आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून तरुणांना तसेच नागरिकांना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहेत. लोकसेवा नशा मुक्त केंद्र या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत शेकडो लोकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला आहे.

आयुर्वेदिक औषधोपचारांच्या सहाय्याने दारूचे व्यसन सोडवण्यासोबतच आम्लपित्त, इसबगोल, मुळव्याध, पोटाचे विकार, वजन कमी करणे, केस गळती, अर्धांगवायू, साखर (मधुमेह), वात, मुंग्या येणे, शिरा दुखणे अशा विविध आजारांवरही त्यांची औषधे प्रभावी ठरत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे.

दारू सुटल्याचे अनेक फोन कॉल्स दररोज येत असून, साखरखेर्डा परिसरातील वडीलधारी मंडळी तसेच तरुण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. व्यसनमुक्तीच्या या चळवळीमुळे अनेक कुटुंबांचे संसार वाचले असून समाजात सकारात्मक बदल घडत आहे.

खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या भावनेतून राधेश्याम बंगाळे हे लोकसेवा नशा मुक्त केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी मोलाचे योगदान देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *