12.68 किलो गांजा सह चार लाख 14 हजार 600 रुपयांचामुद्देमाल जप्त….!!

12.68 किलो गांजा सह चार लाख 14 हजार 600 रुपयांचामुद्देमाल जप्त….!!

 

नागपूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी…..!

 

नागपूर:- दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक हे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना उमरेड त्यांना गुप्त बातमीदाराने अमली पदार्थ गांजा बाबत खात्रीशीर माहिती दिल्ली असता नमूद पथकाला पेट्रोलिंग दरम्यान उमरेड ते नागपूर रोडवर आरोपी आकाश युवराज पंचभाई वय 30 वर्ष राहणार पिंपळगाव, निपाणी तालुका पवनी, जिल्हा भंडारा हा एका लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या बुलेटवर एक काळ्या रंगाच्या मोठी बॅग व पाटील एक मोठी क***** रंगाची बॅग लटकवून वेगाने जाताना दिसून आला. त्याचे दिशेने पथकाने आपले शासकीय वाहन नेले असता त्याने वेगाने आपल्या मोटरसायकलने पळ घातला. पोलिसांच संशय बळावल्याने अमली पदार्थ विरोधी कारवाई पटकन पाचगाव पोलीस चौकीस हजार पोलीस अंमलदारांना त्याबाबत माहिती देऊन त्यांचे मदतीने नमूद आरोपीला कुही फाटा येथे ताब्यात घेतले. पंचायत समिती आणि दोन बॅग ची झडती घेतली अमली पदार्थ गांजा मिळून आला.

आरोपीच्या ताब्यातून अमली पदार्थ गांजा 12. 68 किलोग्राम किंमत दोन लाख 53 हजार 600 रुपये, विना क्रमांकाचे बुलेट मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण चार लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमली पदार्थ गांजा पुरवाटा करणारा आरोपीबाबत माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कुहि येथे कलम 8(क),20(ब)(ii)(ब),22,29 एन डी पी एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व आरोपीला अटक करण्यात आली.

पुढील तपास कुही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करीत आहेत…

 

नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *