एस. ई. एस. हायस्कूलचे NMMS परीक्षेत यश

  • एस. ई. एस. हायस्कूलचे NMMS परीक्षेत यश

CT India News

प्रतिनिधी जुबेर शाह

 

साखरखेर्डा :स्थानिक एस. ई. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एन. एम. एम. एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत अवचार दिव्या नितीन, डुकरे युवराज गणेश व जाधव स्नेहल डिगांबर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य व्ही. एम. ठाकूर यांच्यासह शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक व परिसरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *