*खा. राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत तहसील मध्ये मनेगाव सहित 22 गावे पाणीपुरवठा योजनेची बैठक संपन्न*
सिन्नर प्रतिनिधी,: प्रविण पवार
खा. राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेने मनेगाव सहित २२ गावे पाणीपुरवठा योजनेची बैठक सिन्नर तहसील कार्यालयात तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी भवारी यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नाशिक, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती सिन्नर, अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिन्नर, व्यवस्थापक श्रीजी कंट्रक्शन कंपनी लि. मनेगाव सहित २२ गावे पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या समवेत बैठक संपन्न झाली.
यावेळी खा. राजाभाऊ वाजे यांनी आक्रमकतेने चार महिन्यापूर्वी मीटिंग होऊनही पाईपलाईन रिपेरिंग का केली नाही. विनाकारण चार महिन्याच्या लाईट बिलाचा भुरदंड योजनेतील गावांनी का भरावा. पाईपलाईन तुमच्या निष्काळजीपणामुळे फुटलेली आहे. त्यामुळे चार महिन्याचे लाईट बिल सदर कॉन्ट्रॅक्टरने भरून द्यावे. जोपर्यंत पाईपलाईन रिपेरिंग होत नाही तोपर्यंत चालू असलेल्या रस्त्याचे काम बंद ठेवावे. तुम्ही बंद नाही ठेवले तर मी स्वतः तिथे येऊन काम बंद करेल गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. पिण्याच्या पाण्यासारख्या विषयावर आपण संवेदनशील का नाहीत? आज मोर्चा होऊन आठ दिवस झाले तरी तुम्ही कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. प्रशासकीय अधिकारी तुमच्या विरोधात सांगतात तुम्ही पाईपलाईनचे काम वेळेवर पूर्ण करत नाही. उडवा उडवी चे उत्तर देतात. लवकरात लवकर काम पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करावी अशा सूचना सर्व अधिकारी व श्रीजी कंट्रक्शन व्यवस्थापनाला दिल्या. यावेळी योजनेचे अध्यक्ष, सचिव, गावचे सरपंच, उपसरपंच उपस्थितीत होते.
