महागाव तालुक्यात करंजखेड फुलसावंगी येथे गावठी हातभट्टी दारूवर एलसीबी पथकाचे बुलडोझर

  • महागाव तालुक्यात करंजखेड फुलसावंगी येथे गावठी हातभट्टी दारूवर एलसीबी पथकाचे बुलडोझर

 

 

पोलीस स्टेशन महागाव अंतर्गत मौजे करंजखेड येथील इसम नामे 1) राहुल ज्ञानेश्वर राखडे वय. 23 वर्ष तसेच फुलसावंगी गावचे हद्दीतील इसम नामे 1) अरविंद दत्ता राठोड वय 35 वर्ष,

2) श्याम दत्ता जाधव वय 45 वर्ष असे तिघांवर मोहमास सडवा गावठी हातभट्टी ची दारू तयार करून विक्री करत आसताना मिळून आल्याने आज रोजी सकाळी 11.30 वा. ते 16.30 वा. दरम्यान कारंजखेड व फुलसवंगी गावचे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ यांनी कारवाई केली असून त्या तिन्ही कारवाई मधून एकूण 990 लिटर मोहमास सडवा किमत रुपये 49500/- तसेच 80 लिटर तयार दारू किंमत रुपये 8000/- असा एकूण 57500/- रुपये चा मुद्देमाल मिळून आला असून सॅम्पल काडून घेऊन बाकी मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला आहे…

सदरची कारवाई Api धिरज बांडे, Psi शरद लोहकरे, Asi मुन्ना आडे, Hc तेजाब रणखांब, Hc कुणाल मुंडोकार, pc सुनिल पंडागळे, Pc राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ यांनी केली आहे.. आता गाव हातभट्टीवर बाजीराव सिंघम एलसीबीचा हातोडा पडणार .

 

Ct india News जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *