जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी खडका शाळेत बाल आनंद मेळावा साजरा

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी खडका शाळेत बाल आनंद मेळावा साजरा

 

महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल खडका शाळेत बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कलागुणांना वाव देण्यासाठी आणि व्यवहारिक शिक्षण व्यवसाय ची माहिती होण्याकरिता हा बाल आनंद मेळावा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक संबंध. समजून येतो व विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते याकरिता महाराष्ट्रात शाळांमध्ये आयोजित केल्या जाणारा एक उत्साही उपकर्म म्हणजे बाल आनंद मेळावा. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले व्यवसाय वाढविण्याकरिता अनेक दुकानाचा या मेळाव्यात वापर केला. या बाल दिवस मेळाव्यामध्ये खाद्यपदार्थ हस्तकला व खेळ मनोरंजन असे स्टॉल्स लावून

खरेदी विक्री ग्राहकांशी संवाद आणि आर्थिक नियोजनाचे प्रत्यक्ष धडे मिळतात त्याच उद्देशाने आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका येथे बाल आनंद मेळाव्याची मुख्य वैशिष्ट्ये राबविण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे संचालक डॉ. राजेंद्र पुरोहित यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रतिनिधी अरुणराव देशमुख.उपसरपंच दत्तराव कदम.तंटामुक्ती अध्यक्ष गजानन देशमुख.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद देशमुख. डॉ. संदीप शिंदे.माणिकराव भामकर. अनंतराव देशमुख. साहेबराव देशमुख. अनिल मते.कैलास कवडे. उपस्थित होते. या बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक परमेश्वर पाईकराव. शिक्षक राहुल नागरगोजे. शिक्षिका पल्लवी आडे.श्याम पांचाळ.गजेंद्र मुंढे.माधव मारडकर.तसेच कदम फाउंडेशनचे हनुमान सहाय्य व अश्विन झांबरे . या मेळाव्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Ct india News प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *