पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचे समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन

*पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचे समारोप सत्कार सभारंभाचे आयोजन*

 

दिनांक २८/०२/२०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील Coneference Hall या ठिकाणी माहे फेब्रुवारी/२०२६ मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील पोलीस विभागातुन नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस हवालदार/१२८६ शालीकराम भरतलाल रहांगडाले, पोलीस स्टेशन गोंदिया शहर, यांच्या मा. श्री. गोरख भामरे यांचे शुभ हस्ते त्यांना व त्यांचे कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्हे व भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले. तद्नंतर सेवानिवृत्त पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या कारगिर्द काळात पोलीस विभागात सेवा दिल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, आणि मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी त्यांच्या येणा-या पुढील उज्वल भविष्याकरिता हार्दिक शुभेच्छा देवुन त्यांनी पोलीस विभागात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवउद्गार काढले.

 

सदर कार्यकमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे व मपोनि श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता पोहवा राज वैद्य व मपोका पल्लवी गजभिये यांनी अथक परीश्रम घेतले.

 

गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *