स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांची मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त….!!
भंडारा:- दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चे पथक स्टाफ चा पेट्रोलिंग करीत असताना एका गोपनीय माहिती प्राप्त झाली की मौजा खमारी येते मोहाडी पोलीस स्टेशन हदित अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व फिर्यादी तेथील पोलीस हवालदार तुमाने हे स्टाफ सह खमारी गावाचे प्रवेशद्वारा जवळ, खमारी बु.ते मोहाडी रोड येथे रेड केली असता, यातील आरोपी ट्रॅक्टर चालक देवानंद हेमराज दमाहे वय 21 वर्षे रा. खमारी बुज हा आपले ताब्यातील ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये शासन अधिकार क्षेत्रातील अवेज रेती भरून रेती वाहतुकीच्या परवाना नसताना मिळून आल्याने व त्याचे ताब्यातून एक विनाक्रमांकाची सेंदरी रंगाचा डीआय 742 x1 स्वराज ट्रॅक्टर रुपये 6,00,000/- रू, एक विनाक्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली किंमत अंदाजे एक लाख रुपये, कॉलेज अंदाजे एक ब्रासलेट ची किंमत 6000 रुपये, असा एकूण मुद्देमाल 7,06,000/- रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बेलखेडे, व बीड जमादार खमारी बूज येथील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसून येतोय, तसेच मोहाडी तहसीलदार कुंभकर्णी झोपेत दिसून येतोय, स्थानिक नागरिकांना अवैध रेती वाहतूक का म्हणून दिसतोय आणि महसूल व पोलीस यांनाच का दिसत नाही. फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 137/2026 कलम 303(2) बी. एन. एस. अन्वये मोहाळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई माननीय पोलिस अधीक्षक भंडारा श्री नूरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री निलेश मोरे साहेब, यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार तुमाने, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली असून पुढील तपास मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुरेंद्र बेलखेडे करीत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
