स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई….!!
एकूण 8,06,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त……!!
भंडारा:- दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा भंडाऱ्याचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मौजा नवरगाव तालुका तुमसर, जिल्हा भंडारा, यातील आरोपी ट्रॅक्टर चालक रोहित झामसिंग परतेती वय 21 वर्ष राहणार मोहगाव खदान तालुका जिल्हा भंडारा हा मौजा नवरगाव येथे अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर नी करताना मिळून आल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक हा आपले ताब्यातील ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये शासन अधिकार क्षेत्रातील रेती भरून रेती वाहतुकीच्या परवाना नसताना अवैध रित्या रेती वाहतूक करताना मिळून आल्याने व त्याचे ताब्यातून एक निळ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टर 735 एफ ई ई. कंपनीच्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर, चेसिस क्रमांक mbnak49 admtg 35769, इंजिन क्रमांक ci -1353-sdg 12855 असलेला विना क्रमांकाचे निळ्या रंगाची ट्राली असे ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत आठ लाख रुपये, ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती किंमत सहा हजार रुपये, असा एकूण आठ लाख 6 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक 274 /2026 कलम 305(ई),49 भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तुमसर पोलीस स्टेशन हदीतील तसेच तुमसर तहसील कार्यालय हद्दीतील प्रकरण. स्थानिक महसूल विभाग व पोलीस विभाग मूक गिळून गप्प का….??
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री निलेश मोरे साहेब, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन तुमसर चे अधिकारी करीत आहेत…
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
