*गोंदिया जिल्ह्यातील उत्पादने विदेशात जाणार – रेखलालभाऊ टेंभरे

*गोंदिया जिल्ह्यातील उत्पादने विदेशात जाणार – रेखलालभाऊ टेंभरे*

स्मार्ट प्रकल्प अंतर्गत प्रकल्प समन्वयक व व्यवस्थापन युनिट PCMU आणि palledium consulting India Pvt Ltd च्या तांत्रिक सहाय्याने आयोजित विभागीय खरेदीदार- विक्रेता बैठक27 फेब्रुवारी 2026 शुक्रवारला चिंतन सभागृह वनामती,नागपूर येथे संपन्न झाले. विभागीय खरेदीदार विक्रेता बैठकीला गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष रेखलालभाऊ टेंभरे, जामवंत राऊत तसेच बोर करणार फार्मर प्रोडूसर कंपनी च्या वतीने कृष्णा रेखलाल टेंभरे ,नरेश रामकृष्ण मेंढे उपस्थित होते. बैठकीला सकाळी 9:30 ला नोंदणी करून सुरुवात करण्यात आली. विक्रेता बैठकीला जस्विनी भुतांगे विभागीय MIS तज्ञ, श्रीमती प्रज्ञा गोळघाटे विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट नागपूर तसेच ज्ञानेश्वर तसरे PIU कृषी पुणे व मा. श्री उमेश धाडगे कृषी संचालक हे प्रामुख्याने उपस्थित होते. बाजार जोडणे या विषयावर प्रसाद नळे पॅलॅडियम नागपूर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. खरेदीदार विक्रेता संमेलन बैठक संवाद राऊंड टेबल कॉन्फरन्स सत्र संचालन गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष रेखलालभाऊ टेंभरे व RIU नागपूरचे प्रतीनिधी उपस्थित होते,त्यात गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनीचा उत्पादित उत्पादनाचा आंतरराजीय विदेशी विक्रीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यात गोंदिया ऍग्रो प्रोडूसर कंपनीद्वारे उत्पादित विविध प्रकारचे तांदूळ,बियाणे, पोहा, मूरमुरा व खाद्यतेल आदी वस्तूंचा विदेशात निर्यात करण्याबद्दल सामंजस्य करार करण्यात आले.या करारामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल व हल्ली सुरू असलेले पारंपरिक शेती फायदेशीर ठरेल असे मत किसान नेते रेखलालभाऊ टेंभरे यांनी मांडले.

 

गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *