कारधा पोलिसांनी घातला मोह फुलाच्या हातभट्टीवर छापा

कारधा पोलिसांनी घातला मोह फुलाच्या हातभट्टीवर छापा…..!!

 

एकुण 1,09,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…..!!

 

कारवाई -1

भंडारा:- दिनांक 1 मार्च 2026 रोजी कारधा पोलीस यांना गुप्त माहिती मिळाली की कारधा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध मोह फुलाचे दारू बाबत माहिती मिळतात आरोपी नामे श्री यशवंत डोमा मेश्राम वय 56 वर्ष राहणार करजखेडा. तालुका जिल्हा भंडारा यातील फिर्यादी पोलीस हवालदार साठवणे यांनी गुप्त माहितीवरून करचखेडा येथे रेड केली असता आरोपीचे ताब्यातून एका लोखंडे ड्रम मध्ये २० किलो गरम मोहपास किमती 3000 रुपये, 10 प्लास्टिक चुंगळी मध्ये प्रत्येकी 30 किलो असा अंदाजे 300 किलो सडवा मोहफास किंमत 45,000/- हजार रुपये, एका क***** रंगाच्या प्लास्टिक ट्यूब मध्ये अंदाजे 20 लिटर हात भट्टी किंमत चार हजार रुपये, 4 मन जलावू काळ्या किंमत 1,000/- रुपये, एक जर्मन कर्ची कीमत₹1000/- रूपये,एक नेवार पट्टी कीमत 00/- रूपये,एक विठा मातीची चूल किंमत 00/- रुपये,एक लोखंडी ड्रम 500/- रुपये असा एकूण 54,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अप. क्र.173/2026 कलम 65(ई)(फ)(ब)(क)(ड) म. दा. का.अन्वये गुन्हा कारधा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला.

 

कारवाही 2

 

दिनांक.1मार्च2026 रोजी गुप्त माहिती मिळाली की नवेगाव कोका येथे अवैध मोह फुलाचे दारू बाबत माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी नामे प्रीती नरेश पुसाम वय ४१ वर्ष नवेगाव कोका येथे छापा घातला असता आरोपीचे ताब्यातून 6 निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रम मध्ये प्रत्येकी अंदाजे 45 किलो सळवा मोहफास असा 270 किलो मोहफास किमती दोनशे रुपये प्रमाणे 54,000/- रुपये चा व 6 प्लास्टिक ड्रम किंमत 200/- रुपये प्रमाणे किंमत 1200/- रुपये, असा एकूण 55,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अप.क्र.185/2026 कलम 65(फ) म. दा. का.अन्वये कारधा पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आला.

ही कारवाही मा.पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरूल हसन साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा श्री. निलेश मोरे साहेब, कारधा पोलीस निरीक्षक श्री. गोकुल सूर्यवंशी साहेब, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोरते, पोलीस हवालदार भोयर, पोलीस हवालदार साठवणे, पोलीस हवालदार केंद्रे या संपूर्ण स्टाफ केली.

पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *