महागांव/ माझी नगर उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडेच्या पुढाकारामुळे वार्ड ११ मध्ये कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय
News ct india विशेष यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण महागांव
महागाव शहरात वार्ड क्रमांक ११ मधील नागरिकांना गेल्या एक वर्षापासून भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता अखेर कृतीतून सुटला आहे नगरपंचायत प्रशासनाच्या समन्वयाने आणि माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे यांच्या ठाम पुढाकारातून व अथक प्रयत्नांतून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे
दोन दिवसांपूर्वी वार्डमध्ये बोर मारण्यात आला असून या बोरला मुबलक प्रमाणात पाणी लागले आहे आज त्या बोरवर इलेक्ट्रिक मोटर पंप बसविण्यात आला त्यामुळे वार्ड ११ मधील नागरिकांना नियमित व पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे विशेषत महिलांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी कसरत आता पूर्णपणे संपली आहे.
एकीकडे केवळ घोषणा करणारे लोकप्रतिनिधी दिसत असताना, दुसरीकडे सुरेश पाटील नरवाडे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांचा प्रश्न सोडवून दाखवला आहे. दीर्घ काळ प्रलंबित असलेली ही समस्या बोरवेलमुळे निकाली निघाल्याने संपूर्ण प्रभागात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
कोणताही वैयक्तिक लाभ न पाहता, केवळ लोकहित डोळ्यांसमोर ठेवून सुरेश पाटील नरवाडे यांनी हे कार्य पूर्ण केले असून, त्यांच्या सामाजिक जाणिवेचे व जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मूलभूत गरजांसाठी लढणारे नेतृत्व अजूनही अस्तित्वात आहे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या स्तुत्य कार्याबद्दल प्रभागातील नागरिक एकमुखाने सुरेश पाटील नरवाडे यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर केवळ बोलण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून तोडगा काढणारे नेतृत्व म्हणून सुरेश पाटील नरवाडे आज परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहेत
