पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरगावात संवाद कार्यक्रम संपन्न* 

*पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरगावात संवाद कार्यक्रम संपन्न*

*महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा पदवीधरांशी संवाद; भाजप उमेदवार सुधाकरजी कोहळे यांच्या प्रचाराला गती*

रिपोटर;जयश्री चव्हाण

डोंगरगाव, दि. १७ ऑक्टोबर २०२६ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार श्री. *सुधाकरजी कोहळे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार* यांचा पदवीधरांसोबत संवाद कार्यक्रम डोंगरगाव येथील वेंगंगा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संपन्न झाला.

 

या कार्यक्रमात पदवीधरांशी संवाद साधण्यात आला. निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती.

 

यावेळी डोंगरगावचे माजी सरपंच श्री. पप्पूभाऊ ठाकूर, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूर तालुका महामंत्री श्री. यशपाल भटेरो, श्री. विक्कीभाऊ बहादुरे यांच्यासह इतर मान्यवर व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.

 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या संवाद कार्यक्रमामुळे स्थानिक राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *