*पावडदेना परिसरात वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण*
पावडदेना परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीशिवसेना तालुकाप्रमुख नितेश बांगे यांनी केली आहे
यासंदर्भात त्यांनी राज्याचे मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांना निवेदन सादर केले आहे. वाघाच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
वनविभागाने तातडीने कार्यवाही करून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*रिपोर्टर : जयश्री चव्हाण*
*सी टी इंडिया न्यूज*
