Blog

इतर

साखरखेर्ड्यात तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी राधेश्याम बंगाळेंचे उल्लेखनीय कार्य CT India News प्रतिनिधी जुबेर शाह साखरखेर्डा येथे सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून विशेषतः तरुण पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, काही ठिकाणी घटस्फोटासारख्या गंभीर घटना घडल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षांपासून राधेश्याम बंगाळे हे आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून तरुणांना तसेच नागरिकांना दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहेत. लोकसेवा नशा मुक्त केंद्र या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत शेकडो लोकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला आहे. आयुर्वेदिक औषधोपचारांच्या सहाय्याने दारूचे व्यसन सोडवण्यासोबतच आम्लपित्त, इसबगोल, मुळव्याध, पोटाचे विकार, वजन कमी करणे, केस गळती, अर्धांगवायू, साखर (मधुमेह), वात, मुंग्या येणे, शिरा दुखणे अशा विविध आजारांवरही त्यांची औषधे प्रभावी ठरत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. दारू सुटल्याचे अनेक फोन कॉल्स दररोज येत असून, साखरखेर्डा परिसरातील वडीलधारी मंडळी तसेच तरुण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. व्यसनमुक्तीच्या या चळवळीमुळे अनेक कुटुंबांचे संसार वाचले असून समाजात सकारात्मक बदल घडत आहे. खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या भावनेतून राधेश्याम बंगाळे हे लोकसेवा नशा मुक्त केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी मोलाचे योगदान देत आहेत.

साखरखेर्ड्यात तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी राधेश्याम बंगाळेंचे उल्लेखनीय कार्य CT India News प्रतिनिधी जुबेर शाह साखरखेर्डा येथे सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या…

इतर

महागाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला बचत गटांसाठी २दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम चार बॅचमध्ये यशस्वी रित्या पार पडला

महागाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला बचत गटांसाठी २दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम चार बॅचमध्ये यशस्वी रित्या पार पडला    …

इतर

यवतमाळ/ कळंब पोलीस स्टेशन हद्दीत बाप-लेकांनी कुन्हाडीने तोडून हत्या केल्याची घटना घडली

यवतमाळ/ कळंब पोलीस स्टेशन हद्दीत बाप-लेकांनी कुन्हाडीने तोडून हत्या केल्याची घटना घडली      कळंब पोलीस स्टेशन हद्दीत दोनोडा गावात…

इतर

एंटी नार्कोट्रिकस ट्रॉक्स फोर्स विभाग की बड़ी कार्रवाई 505 किलो गांजा सह वाहन चालक पोलिश की गिरफ मे

एंटी नार्कोट्रिकस ट्रॉक्स फोर्स विभाग की बड़ी कार्रवाई 505 किलो गांजा सह वाहन चालक पोलिश की गिरफ मे   आज…

इतर

भाजप शहर उपाध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश,दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाला प्रलंबित निधी

भाजप शहर उपाध्यक्षांच्या पाठपुराव्याला यश,दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाला प्रलंबित निधी   प्रतिनिधी राम चव्हाण यवतमाळ     महागाव नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग…

इतर

आमदार आशिष देशमुखांकडून ६० लाखांचा निधी मंजूर मोहपा येथील ऐतिहासिक बन्सोड उद्यानाचा होणार कायापालट

आमदार आशिष देशमुखांकडून ६० लाखांचा निधी मंजूर मोहपा येथील ऐतिहासिक बन्सोड उद्यानाचा होणार कायापालट       कळमेश्वर तालुक्यातील मोहपा…

इतर

रिदा अबरार खान हिने राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत मिळवले प्रथम पारितोषिक

रिदा अबरार खान हिने राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत मिळवले प्रथम पारितोषिक     बुलढाणा : येथील सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूल या…