रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर मौदा पोलिसांची धडक कारवाई

रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर मौदा पोलिसांची धडक कारवाई

 

रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर मौदा पोलिसांची धडक कारवाई

 

 

मौदा :रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात मौदा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन टिप्पर चालकांसह वाहनमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत सुमारे १९ ब्रास रेतीसह दोन टिप्पर असा एकूण ९०,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक १९/१२/२६ रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन मौदा येथील पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश बोथले तसेच पोलीस अंमलदार भास्कर मेटकर, संदीप कडु, गणेश मुदमाळी, रूपेश महादुले व दिपक दरोडे यांचे पथक कोबींग ऑपरेशनदरम्यान मौदा हद्दीत गस्त घालत होते. यावेळी माथनी टोल नाक्याजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना भंडाऱ्याकडून नागपूरच्या दिशेने येणारे ट्रक क्रमांक एम.एच.४० बि.एफ.९९१० व ट्रक क्रमांक एम.एच.४० सी.टी.९३०० हे रेती भरून जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे १९ ब्रास रेती आढळून आली. सदर रेतीची किंमत सुमारे ९५,००० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. चालकांकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे त्यांनी मान्य केल्याने पोलिसांनी कारवाई करत रेतीसह दोन्ही ट्रक जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या दोन्ही ट्रकची किंमत सुमारे ९०,०००,००० रुपये असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ९०,९५,००० रुपये आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन मौदा येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७), ४८(८), खाण व खनिज अधिनियम कलम ४, २१ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी ट्रक चालकांची नावे अमीत नरेश बागडे (वय ३२, रा. फुलमोगरा ता. जि. भंडारा) व सुमीत लक्ष्मण मेश्राम (वय २६, रा. नाथनगर मौदा ता. मौदा) अशी आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, उप्पर पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा मौदा पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे दिला आहे.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *